Posts

मराठीतील नवी कादंबरी : टार्गेट असद शाह

Image
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध पाकिस्तानी दहशतवादी आणि चायना यांच्याकडून एक घातपाताचा कट शिजतो. त्यासाठी संपूर्ण संरक्षण यंत्रणा वेठीस धरली जाते पण तो कट सफल होतो की नाही? त्यात फक्त बाहेरच्या देशातले सामील असतात की भारतातले देखील? यासाठी कादंबरी वाचणं इष्ट होईल.       ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये लिखित 'टार्गेट असद शाह' या कादंबरीची ही थोडक्यात रूपरेषा. कादंबरीचं शीर्षक वाचल्यापासूनच उत्कंठा निर्माण होते. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला अरबी भाषेत असद शाह म्हणतात याचा उलगडा लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीलाच केलेला आहे. या कादंबरीचं कथानक अतिशय वेगवान आहे. कादंबरी काहीशी नॉन लिनीअर पद्धतीने उलगडत जाते आणि वेळोवेळी स्थळ काळाचे उल्लेख आपल्यासमोर मांडत जाते. कादंबरीमध्ये भूगोल हा देखील महत्वाचा घटक आहे, आणि लेखकाने त्याचा अनुभव आणि अभ्यास येथे पुरेपूर वापरलेला दिसतो. कादंबरीच्या शेवटी दिलेली भौगोलिक स्थळांची यादी वाचून थक्क व्हायला होतं. कादंबरीत उल्लेखलेल्या जवळजवळ सर्व स्थळांना लेखकाने स्वतः भेट दिलेली आहे. कादंबरीतले महत्वा...

You don't mess with the special investigators

Image
ब्लॉगच्या शीर्षकावरून अनेकांच्या लक्षात आलंच असेल की हा ब्लॉग कशाविषयी आणि कोणाविषयी आहे. ब्रिटिश लेखक जेम्स ग्रँट ज्याला आपण त्याच्या 'पेन नेम' ली चाईल्ड या नावाने ओळखतो त्याच्या जॅक रिचर सिरीजचे अनेक चाहते जगभरात आहेत. १९९७ साली ली चाईल्डने या पुस्तक मालिकेला प्रारंभ केला आणि आत्तापर्यंत तब्बल २७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि २८ वं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याच मालिकेतील ११ व्या म्हणजेच बॅड लक अँड ट्रबल या पुस्तकाविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.  कादंबरीची सुरुवात होते कॅलिफोर्नियातील एका वाळवंटातील घडामोडीने. एका माणसाचे दोन्ही पाय मोडून त्याला हेलिकॉप्टर मधून 3000 फुटावरून खाली फेकण्यात येते, त्यानंतर १७ दिवसांनी जॅक रिचर आपल्या अंगावरचे कपडे आणि एक ATM कार्ड एवढंच स्वतःजवळ बाळगून कॅलिफोर्नियात इतस्ततः भटकत असताना एका ATM मशिनमधून पैसे काढण्यासाठी जातो तेव्हा त्याला समजतं की त्याच्या खात्यात कोणा अनामिक व्यक्तीने $१०३०.०० इतकी रक्कम जमा केली आहे. या अनामिक व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तो बँकेच्या कस्टमर केअरला फोन करतो तेव्हा बँकेची कर्मचारी रिचरला त्या...

दुर्दम्य..असामान्य लोकमान्य

Image
पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. ब्रिटिश अधिकारी रँडच्या आदेशानुसार सोजिरे पुणेकरांवर अनन्वित अत्याचार करीत होते. या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पुण्यात २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. या हत्येमागे बळवंतरावांचा हात असल्याच्या संशयावरून इंग्रजांनी टिळकांना अटक केली आणि १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अखेर कोणत्याही सत्काराच्या समारंभात भाग घ्यायचा नाही या अटीवर बळवंतरावांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यावर बळवंतराव त्यांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धनांच्या घरी गेले आणि त्यांना नमस्कार केला. अण्णासाहेबांनी त्यांना घट्ट मिठीच मारली. बळवंतरावांच्या देहाची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "आता पुढे काय विचार आहे?" तेव्हा बळवंतरावांच्या काळ्या ठिक्कर पडलेल्या ओठातून क्षीण पण ठाम आवाजात शब्द उमटले, "पुनःश्च हरि ओम !"         गंगाधर गाडगीळ लिखित "दुर्दम्य" या कादंबरीच्या बाबतीत अशीच काहीशी हकीकत माझ्या बाबतीत घडली. मागच्या वर्षी ही कादंबरी वाचायला घेतली होती पण काही कारणाने ती अर्धवटच सोडावी लागली. मग यावर्षी अगदी ठरव...