Posts

Showing posts from August, 2025

The Visitor: A Suspense Story You Can’t Put Down

Image
The Visitor (किंवा Running Blind) हे ली चाईल्डच्या रिचर सिरीज मधील हे चौथं पुस्तक. जॅक रिचर हा भूतपूर्व मिलिटरी पोलिस अधिकारी, अत्यंत बुद्धिमान, थोडक्यात बोलणारा, पण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा, कोणत्याही ठिकाणी जास्त काळ न थांबणारा, आणि जगण्याच्या पद्धतीविषयी स्वतःचं एक वेगळं तत्त्वज्ञान असणारा असा एक विलक्षण अवलिया. परंतु या पुस्तकात रिचर आपल्या नेहमीच्या भटक्या जीवनशैलीपासून थोडा विराम घेतो आणि  त्याच्या गर्लफ्रेंड सोबत तिच्या वडिलांनी रिचरच्या नावावर केलेल्या एका बंगल्यात राहतो.                               कथेची सुरुवात अमेरिकेतील विविध ठिकाणी घडणाऱ्या एका अनोख्या आणि विचित्र खून मालिकेपासून होते. एका ठराविक कालावधीनंतर, एकामागून एक भूतपूर्व मिलिटरीतील स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळतात. प्रत्येक मृतदेहाच्या आजूबाजूचा देखावा जवळजवळ एकसारखा असतो. बाथटबमध्ये मिलिटरीमध्ये वापरला जाणारा गडद हिरवा रंग काठोकाठ भरलेला, टबमध्ये शांतपणे पडलेला मृतदेह, क...