Posts

Showing posts from July, 2025

Beyond Sci-Fi: Stories of Ingenuity, Isolation, and the Human Spirit by Andy Weir

Image
  The Martian सिनेमा बघून बरीच वर्ष झाली होती पण लेखक Andy Weir लिखित त्याच नावाचं पुस्तक वाचण्याचा योग आला नव्हता.  पण त्याच लेखकाच्या Project Hail Mary या पुस्तकावर देखील सिनेमा येतो आहे हे कळल्यावर तातडीने ते पुस्तक वाचायला घेतलं आणि या लेखकाची पुस्तकं वाचायला आपण बराच उशीर केला असं वाटलं.  Project Hail Mary हे  पुस्तक एका शिक्षकावर बेतलेले आहे. एक हायस्कुल मधील विज्ञानाचा शिक्षक एके दिवशी अंतराळयानात एका अनोळखी तारामंडळात असताना जागा होतो. आपण कोण? इथे कुठून आलो हे देखील त्याला आठवत नसते. त्याला त्याचे सहप्रवासी मृतावस्थेत आढळतात. Ryland Grace असं नाव असणाऱ्या शिक्षकाला नासाने एका खास मिशनवर पाठवलेले असते. कट टू- सूर्याचे तेज दिवसेंदिवस घटत चालले आहे आणि येत्या 9-10 वर्षात ते मोठ्या प्रमाणात कमी होऊन त्याचा परिणाम पृथ्वीवरील जीवन नष्ट होण्यात होऊ शकतो असे नासाच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात येते. परंतु दुसऱ्या तारामंडळातील एका ग्रहावर त्याचा विशेष परिणाम होत नाहीये हे शास्त्रज्ञांच्या लक्षात येते. त्या ग्रहावर नक्की कशामुळे परिणाम होत नाहीये हे शोधण्यासाठी नासाची टी...